Ujjwala Gas Yojana नमस्कार मित्रांनो देशात बहुतांश कुटुंब हे दारिद्र रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत. आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांना गॅस कनेक्शन घेणे शक्य नसते त्यामुळे ते चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे जंगल तोड केली जाते तसेच चुलीवर जेवण बनवल्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर त्या चुलीच्या धुराचा त्रास होतो व ते दम्या सारख्या आजारांना बळी पडतात या सर्व गोष्टींचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी 1 मे 2016 रोजी उज्वला गॅस योजना संपूर्ण भारतात सुरु करण्याची घोषणा केली.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
Ujjwala Gas Yojana प्रधानमंत्री यांनी आपल्या घोषणेत सांगितले की भारतातील गरीब व दारिद्र रेषेखालील जे कुटुंब आहेत त्यांना या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर दिले जातील. या योजनेअंतर्गत 14.2 किलो वजनाचा सिलेंडर दिला जातो परंतु डोंगराळ भागात इतक्या भारी वजनाचा सिलेंडर घेऊन जाणे शक्य नसते त्यामुळे शासनाने 5 किलो वजनाचे 2 सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत जे घेऊन जाणे शक्य होईल.या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 1600/ रुपये दिले जातात या योजनेची महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत दिले जाणारे गॅस कनेक्शन फक्त कुटुंबातील महिलेच्या नावावर दिले जाते.
ग्रामीण भागात आजही अनेक महिला स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करतात. चुली बनवण्यासाठी महिला लाकूड किंवा इतर ज्वलनशील पदार्थ वापरतात. यामुळे स्वयंपाक करणाऱ्या महिलांची आणि पर्यावरणाचीही हानी होते. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना सुरू केली आहे. ही योजना 1 मे 2016 रोजी सुरू करण्यात आली. 2016 ते 2019 पर्यंत या योजनेअंतर्गत 8 कोटी एलपीजी वितरीत करण्यात आले आहेत.Ujjwala Gas Scheme