7th pay commission नमस्कार:सरकारी कर्मचाऱ्यांच्या लॉटरी लागली महागाई भत्त्यात 4 टक्क्याने झाली महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के लाभ लागु करणे संदर्भात राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये अधिकृत्त निर्णय घेतला जाणार आहे .
7th pay commission मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 मार्च व 14 मार्च 2024 रोजी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे . सदर बैठकीमध्ये आचारसंहिता पुर्वीच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा तसेच विविध उपाय योजना , सुविधा बाबत अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहेत . यांमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत केंद्र सरकार प्रमाणे डी.ए लाभ लागु करण्यात येणार आहेत .”7th pay commission
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मंजूर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. हा महागाई भत्ता 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.